रूट्गर ब्रेगमन युरोपातले तरुण, लक्षवेधी इतिहासकार आहेत. युटोपिया फॉर रिअॅलिस्ट्स या त्यांच्या पुस्तकास संडे टाइम्स आणि न्यू यॉर्क टाइम्सने सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत स्थान दिलं आहे. त्या मूळ डच पुस्तकाचा एकूण 32 भाषांत अनुवाद झाला आहे. द कॉरसपाँडंटमधील कामासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युरोपियन प्रेस प्राइझ’ या पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकन देण्यात आलं होतं. 2020च्या बिग इश्यूच्या टॉप 100 चेंजमेकर्सच्या यादीत त्यांचं स्थान दहाव्या क्रमांकावर आहे.
Marathi Books / मराठी पुस्तके
मराठीत वाचण्यासाठी खूप चांगली पुस्तके ✨ Editors’ Must-Read List | बुद्धिवादी पुस्तके | नास्तिक पुस्तके | Rationalist / Atheist Books in Marathi
Showing all 10 results
-
ह्युमनकाइंड – मानवजातीचा आशावादी इतिहास
₹499.00 Add to cartह्युमनकाइंड – मानवजातीचा आशावादी इतिहास
ह्युमनकाइंड – मानवजातीचा आशावादी इतिहास
रूट्गर ब्रेगमन
आंतरराष्ट्रीय बेस्टसेलरचा मराठी अनुवाद
हे पुस्तक मानवी स्वभावाबद्दलच्या आपल्या गृहीतकांनाच आव्हान देते, त्यामुळे नवीन शक्यतांचे जग आपल्यासमोर खुले होते. माणसं ही मुळातच अत्यंत दुष्ट आणि स्वार्थी असतात, याबद्दलचा उपहासयुक्त दृष्टिकोन बदलायला लावते आणि अधिक तेजस्वी भविष्याचा मार्ग उजळते. या पुस्तकात लेखकाने मानवी स्वभावाचे केलेले पुनर्मूल्यांकन हे प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारलेले आहे, त्यामुळे मानवी स्वभाव नव्याने समजून घेता येतो. हे पुस्तक निश्चितच मानवतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सर्वांना उन्नत करणारे आहे.
“अत्यंत कौशल्याने लिहिलेलं पुस्तक… ब्रेगमननी इतिहासाच्या लावलेल्या नव्या अर्थामुळे मानवी स्वभाव नव्याने समजून घेता येतो. ह्युमनकाइंड संवादच बदलून टाकते आणि अधिक तेजस्वी भविष्याचा मार्ग उजळते. कधी नव्हे ती आज आपल्याला त्याची अत्यंत गरज आहे.’- सुसान केन, क्काएट या पुस्तकाच्या लेखिका
“हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याची व्याप्तीही विशाल आहे आणि गोष्ट सांगण्याची तऱ्हा तर मंत्रमुग्ध करणारी आहे. अप्रतिम आहे हे पुस्तक!” – टिम हार्फोर्ड, द अंडरकव्हर इकानाॉंगिस्ट या पुस्तकाचे लेखक
“उपरोधात्मक टीकायुक्त लेखन हे सर्वच विषयांबरचे सिद्धान्त सांगितल्यासारखं करता आलं तरी हा दृष्टिकोन मुद्दामच निबडलेला असतो, असं रूट्गर ब्रेगमन अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात. अधिक चांगल्या भविष्याच्या छोट्याशा पायवाटेचं रूपांतर ब्रिस्तृत राजमार्गात करण्याची शक्यता प्रस्तुत पुस्तक दाखवते, हे नक्कीच.” – डेव्हिड बॅलेस-वेल्स, द अनइनहॅबिटेबल अर्थ या पुस्तकाचे लेखक
माणूसघाण्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणारे पुस्तक – भयभीत जगासाठी आशेचा जणू दीपस्तंभच!’ – डॅनी डोलिंग, इनडक्रॅलिटी अँड द 1% या पुस्तकाचे लेखक
*रूट्गर ब्रेगमम हे एकांडे शिलेदार आहेत, स्वतःचा वेगळा विचार करणारे आहेत, त्यांनी इतिहासाचा आधार घेऊन आपल्याला म्हणजे उर्वरित सर्वांना एक खूपच चांगलं भविष्य उभारण्याची संधी देऊ केली आहे, जिची सध्याच्या काळात आपण कल्पनाही करू शकत नव्हतो.” – टिमोथी स्नायडर, ऑन टायरनी या पुस्तकाचे लेखक
₹499.00 -
भारताचे संविधान – इंग्रजी आणि मराठी आवृत्ती
₹1,500.00 Add to cartभारताचे संविधान – इंग्रजी आणि मराठी आवृत्ती
भारताचे संविधान
2021 च्या 105 सुधारणा पर्यंत अद्यतनित
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.
हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो.
भारताची राज्यघटना आता मराठी आणि इंग्रजीत. किंवा 2020 च्या 105 व्या दुरुस्तीपर्यंतच्या नवीन सुधारणा देखील समाविष्ट केल्या आहेत. ज्या मराठी वाचकांना आपली राज्यघटना त्यांच्या मातृभाषेत वाचायला आवडते त्यांच्यासाठी हे सादर केले आहे. Constitution of India in Marathi / Bharatache Samvidhan Marathi
₹1,500.00 -
रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट टी कियोसाकी
₹399.00 Add to cartरिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट टी कियोसाकी
रिच डॅड पुअर डॅड
रॉबर्ट टी कियोसाकी
या पुस्तकात पैसा, गुंतवणूक, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयांतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना रॉबर्ट कियोसाकी यांनी सोप्या करून सांगितल्या आहेत. महाविद्यालयात जा, चांगली नोकरी मिळवा, पैसे साठवा, कर्ज फेडा, जास्त काळासाठी गुंतवणूक करा, निरनिराळे पर्याय शोधा – हा जुना सल्ला, हल्लीच्या वेगाने धावणार्या माहितीच्या युगात अप्रचलित झाला आहे, हे ते या पुस्तकात सांगतात. त्यांच्या श्रीमंत डॅडची तत्त्वं आणि संदेश आत्ताच्या परिस्थितीला आव्हान देतं. त्यांची शिकवण लोकांना अर्थसाक्षर व्हायला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रत्यक्ष गुंतवणूक करायला प्रोत्साहित करते.
₹399.00 -
इलॉन मस्क
₹499.00 Add to cartइलॉन मस्क
इलॉन मस्क
अश्ली व्हॅन्स
पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! या सार्याच कंपन्यांनी व्यवसाय व उद्योगक्षेत्र यांमध्ये एक नवी लाट निर्माण केलेली आहे. सतत धोके पत्करणारा इलॉन अपयशांना घाबरून मागे हटत नाही. तो मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत धडपडत असतो. हे पुस्तक म्हणजे इलॉन मस्कने मानवजातीचा प्रवास मंगळाच्या दिशेने न्यावा का, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा
मूलभूत लेखाजोखा आहे. इलॉन मस्कच्या आयुष्याची गाथा आणि त्याची विजिगीषू वृत्ती यांचे यथार्थ चित्रण हे पुस्तक करते.
₹499.00 -
ब्रीफ आनन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स – स्टीफन हॉकिंग
₹299.00 Add to cartब्रीफ आनन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स – स्टीफन हॉकिंग
ब्रीफ आनन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स
स्टीफन हॉकिंग
जगविख्यात विश्वरचना शास्त्रज्ञ आणि द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक. हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत – विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पृथ्वी वर मानव जात जगून राहील का? आपल्या सूर्यमाले बाहेर बुद्धिमान जीवसृष्टी आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आपल्या वर नियंत्रण ठेवेल का? मानव जाती समोर असलेली आव्हानं आणि पृथ्वी कोणत्या दिशेने विस्तारत आहे, या विषयी लेखकानं प्रस्तुत पुस्तकात आपले विचार मांडले आहेत.
स्टीफन हॉकिंग हे सैद्धान्तिक भौतिक शास्त्रातले एक असामान्य बुद्धि मानशास्त्रज्ञ म्हणून विख्यात होते, ते महान विचारवंतांपैकी एक मानले गेले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी तीस वर्षं गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून काम पाहिलं. त्यांचं पहिलं पुस्तक, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर ठरलं.
₹299.00 -
अर्ली इंडियन्स
₹399.00 Add to cart -
होमो डेअस – युवाल नोआ हरारी
₹499.00 Add to cartहोमो डेअस – युवाल नोआ हरारी
होमो डेअस
युवाल नोआ हरारी
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि जेनेटिक इंजिनिअरिंग या तंत्रज्ञानाच्या संयोगातून मानवाला जणू ईश्वरी शक्तीच प्रदान होतील अशी परिस्थिती आहे असे झाले तर काय घडू शकेल, याचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.
होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठया भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे .
अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध
पाने 378 मूल्य रु499
₹499.00 -
देव नावाचा भ्रम – रिचर्ड डॉकिन्स
₹499.00 Add to cartदेव नावाचा भ्रम – रिचर्ड डॉकिन्स
देव नावाचा भ्रम
रिचर्ड डॉकिन्स
इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या… वगैरे-इतिहासापुरतीच मर्यादित होऊन राहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाच लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश काल असित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खर्या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्वरवादाचे काम असेल.
देव एक भ्रम आहे आणि तो तसाच ओळखावा.
अनुवाद : मुग्धा कर्णिक
पाने 512 मूल्य रु499
₹499.00 -
२१व्या शतकासाठी २१ धडे – युवाल नोआ हरारी
₹450.00 Add to cart२१व्या शतकासाठी २१ धडे – युवाल नोआ हरारी
२१व्या शतकासाठी २१ धडे
युवाल नोआ हरारी
सेपियन्स आणि होमो डेअस या जग प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक युवाल नोआ हरारी यांचे वर्तमानातील वास्तवावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
आपण कल्पित -कथा रचल्या आपल्या प्रजातीनी एकत्र यावं यासाठी आपण निसर्गाचं दमन केलं
स्वतः शक्तिशाली होण्यासाठी आता आपण जीवनाची पुनर्रचना करत आहोत आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी पण आपण याहून अधिक स्वतःला ओळखलंय का? की आपण लावलेले शोध आपल्यालाच
असंबद्ध ठरवणार आहेत?मराठी अनुवाद
पाने 392 मूल्य रु450
₹450.00 -
सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
₹499.00 Add to cartसेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
युव्हाल नोआ हरारी
“१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक…सेपिअन्स. ”
मराठी अनुवाद
पृष्ठे 452 मूल्य रु499
₹499.00