देव नावाचा भ्रम – रिचर्ड डॉकिन्स
₹499.00
देव नावाचा भ्रम
रिचर्ड डॉकिन्स
इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या… वगैरे-इतिहासापुरतीच मर्यादित होऊन राहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाच लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश काल असित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खर्या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्वरवादाचे काम असेल.
देव एक भ्रम आहे आणि तो तसाच ओळखावा.
अनुवाद : मुग्धा कर्णिक
पाने 512 मूल्य रु499
Shrikant Sonawane –
खुप छान आहे
Arun Sable –
मी ऑर्डर केले आणि मिळाले. धर्माध व धार्मिक दोन्हीही लोकांनी जरूर वाचावे.
Rajeev Gajbhiye –
It is very nice
Nilesh Patil –
One of the best books I have ever studied !!!!! Every intellectual must read it …would sure erase this unhealthy …harmful delusion calld god from your mind !!!!✌✌✌✌
DrVijay Randive –
इंग्रजी आवृत्ती आहे माझ्याकडे. पण भाषा जड जाते समजायला. मराठी आवृत्ती ऑर्डर केली आता. खुप छान पुस्तक आहे. नास्तिकांची बायबल म्हटल्यास गैर ठरणार नाही.
Sanjay Kandekar –
नक्की वाचा बुद्ध नव्याने समजेल, बुद्ध म्हणजे अंधश्रद्धेला तिलांजली।.
Bhimrao Tayde –
माझ्याकडे हे पुस्तक असून वाचायला सुरुवात केली आहे।
पहिल्या आवृत्तीची मूळ लेखकाची प्रस्तावना व अनुवादक मुग्धा कर्णिक यांची प्रस्तावना वाचूनच पुढील प्रकरणे कधी वाचून काढतो अशी वाचकास ओढ निर्माण होते।
एव्हढे चांगले पुस्तक मराठी अनुवादित, प्रकाशित होण्यास खरं तर खूपच उशीर झाला आहे।