रूट्गर ब्रेगमन युरोपातले तरुण, लक्षवेधी इतिहासकार आहेत. युटोपिया फॉर रिअॅलिस्ट्स या त्यांच्या पुस्तकास संडे टाइम्स आणि न्यू यॉर्क टाइम्सने सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत स्थान दिलं आहे. त्या मूळ डच पुस्तकाचा एकूण 32 भाषांत अनुवाद झाला आहे. द कॉरसपाँडंटमधील कामासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युरोपियन प्रेस प्राइझ’ या पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकन देण्यात आलं होतं. 2020च्या बिग इश्यूच्या टॉप 100 चेंजमेकर्सच्या यादीत त्यांचं स्थान दहाव्या क्रमांकावर आहे.
ह्युमनकाइंड – मानवजातीचा आशावादी इतिहास
₹499.00
ह्युमनकाइंड – मानवजातीचा आशावादी इतिहास
रूट्गर ब्रेगमन
आंतरराष्ट्रीय बेस्टसेलरचा मराठी अनुवाद
हे पुस्तक मानवी स्वभावाबद्दलच्या आपल्या गृहीतकांनाच आव्हान देते, त्यामुळे नवीन शक्यतांचे जग आपल्यासमोर खुले होते. माणसं ही मुळातच अत्यंत दुष्ट आणि स्वार्थी असतात, याबद्दलचा उपहासयुक्त दृष्टिकोन बदलायला लावते आणि अधिक तेजस्वी भविष्याचा मार्ग उजळते. या पुस्तकात लेखकाने मानवी स्वभावाचे केलेले पुनर्मूल्यांकन हे प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारलेले आहे, त्यामुळे मानवी स्वभाव नव्याने समजून घेता येतो. हे पुस्तक निश्चितच मानवतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सर्वांना उन्नत करणारे आहे.
“अत्यंत कौशल्याने लिहिलेलं पुस्तक… ब्रेगमननी इतिहासाच्या लावलेल्या नव्या अर्थामुळे मानवी स्वभाव नव्याने समजून घेता येतो. ह्युमनकाइंड संवादच बदलून टाकते आणि अधिक तेजस्वी भविष्याचा मार्ग उजळते. कधी नव्हे ती आज आपल्याला त्याची अत्यंत गरज आहे.’- सुसान केन, क्काएट या पुस्तकाच्या लेखिका
“हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याची व्याप्तीही विशाल आहे आणि गोष्ट सांगण्याची तऱ्हा तर मंत्रमुग्ध करणारी आहे. अप्रतिम आहे हे पुस्तक!” – टिम हार्फोर्ड, द अंडरकव्हर इकानाॉंगिस्ट या पुस्तकाचे लेखक
“उपरोधात्मक टीकायुक्त लेखन हे सर्वच विषयांबरचे सिद्धान्त सांगितल्यासारखं करता आलं तरी हा दृष्टिकोन मुद्दामच निबडलेला असतो, असं रूट्गर ब्रेगमन अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात. अधिक चांगल्या भविष्याच्या छोट्याशा पायवाटेचं रूपांतर ब्रिस्तृत राजमार्गात करण्याची शक्यता प्रस्तुत पुस्तक दाखवते, हे नक्कीच.” – डेव्हिड बॅलेस-वेल्स, द अनइनहॅबिटेबल अर्थ या पुस्तकाचे लेखक
माणूसघाण्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणारे पुस्तक – भयभीत जगासाठी आशेचा जणू दीपस्तंभच!’ – डॅनी डोलिंग, इनडक्रॅलिटी अँड द 1% या पुस्तकाचे लेखक
*रूट्गर ब्रेगमम हे एकांडे शिलेदार आहेत, स्वतःचा वेगळा विचार करणारे आहेत, त्यांनी इतिहासाचा आधार घेऊन आपल्याला म्हणजे उर्वरित सर्वांना एक खूपच चांगलं भविष्य उभारण्याची संधी देऊ केली आहे, जिची सध्याच्या काळात आपण कल्पनाही करू शकत नव्हतो.” – टिमोथी स्नायडर, ऑन टायरनी या पुस्तकाचे लेखक
✅ SHARE THIS ➷
Reviews
There are no reviews yet.