शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांचं या ग्रहावरील आगमन, या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रिती नं त्याचं निराकरण केलं आहे. मानवी अवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी ‘आर्यांचं स्थलांतर’ हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल,असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे.
या विषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफ नी पुरातत्त्व शास्त्र, भाषा शास्त्र, अनुवंश शास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्ध रितीनं दिली आहे.
टोनी जोसेफ हे अत्यंत नामवंत पत्रकार आहेत. बिझनेस वर्ल्ड या मासिकाचे ते माजी संपादक आहेत. 2018 पर्यंत त्यांनी माइंड वर्क्स ग्लोबल मीडिया सर्व्हिसेस या संस्थेच्या चेअरमन पदाची व सहसंस्थापक पदाची धुरा सांभाळली. दिल्ली मध्ये निवास करणारे टोनी जोसेफ यांचे अर्ली इंडियन्स हे पुस्तक अतिशय गाजले आहे.
Reviews
There are no reviews yet.